आयुर्वेदात वात, पित्त, कफ, असे त्रिदोष आहेत, जे प्राक्रुत अवस्थेत उपयोगि व शरिराचे धारण करणारे आहेत. तर विक्रुत झाले कि, हेच शरिरांतील इतर घटकांना बिघडवून आजार निर्माण करतात...
..पैकि ,, पित्त,, हे अन्नपचन प्रक्रियेतिल महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याचे प्राक्रुत असणे गरजेचे आहे. हे ज्याप्रमाणे , पित्ताशयांत,, येते. तसेच आपण घेतलेल्या आहारातून ही येतं. त्यामुळेच जरि पित्ताशय काढले तरि, त्याचे काम आमाशयांत चालूच राहते.
.. ज्याप्रमाणे ,,तुपाचा दिवा लावल्यानंतर तूप जळून त्यातून अग्नि तयार होतो. तसेच आपल्या शरिरात देखिल घेतलेला आहार जळतो. व त्यातूनच ,, अग्नि,, तयार होतो.. म्हणजेज जठराग्नि म्हणूनच जेवणांत तिखट, तेलकट, पदार्थ खाल्ले कि, भूक वाढते.
म्हणजेच। ,,पित्त,, वाढते. आणि गोड खाल्ले कि, भूक शमते. व आपले पित्तही कमि होते. पण जास्त गोड खाल्ले कि भूक मंदावते. व ,अग्निमांद्य, होते. .. अर्थात तुम्हि जे खाता, आधि त्याचे पित्तात व पर्यायाने अग्नित रूपांतर होते.
म्हणूनच पित्त वाढु द्यायचे नसेल तर, आहाराकडे लक्ष द्यावे.., अँटासिड, च्या गोळ्या जास्त खाउ नये. कारण तो तात्पुरता उपचार असतो..,, अश्यावेळि फक्त पित्त घट्ट होते आणि त्याचेच खडे तयार होतात.
लक्षणेः। छातित जळजळणे, मळमळ, उलटिचि भावना होणे, जेवणानंतर करपट ढेकर येतात, डोके दुखते, त्वचा विकार होतात, खाज सुटते सर्वांगाला, चेहर्यावर पुरळ येतात. केस गळतात..
मग यावर काहि घरगुति उपाय बघूः गुलकंद खावा, मनुके खडिसाखर, गाईचे तूप, हे सर्व आहारात असावे
१ चमचा धने व १ चमचा जिरे कुटून एक ग्लास कोमट पाण्यात दहा मिनिटे भिजवुन , कुस्करून प्यावे.
१/४ चमचा ज्येष्ठमध पावडर दूधातून, अथवा पाण्यातून तिन दिवस घेतल्याने पित्त कमि होते.
आयुर्वेदिक दुकानात ,,सूत शेखर, मात्रा मिळते हि उगाळून दूधातून घ्यावि. घरातले फ्रिजचे थंड दूध घ्यावे.
आवळ्याचे चूर्ण मधातून घ्यावे, ..पुदिना, काळि मिरे, मीठ, कोथिंबिर व भाजलेल्या जिर्याचे चूर्ण मिसळून हि चटणि कायम जेवणात ठेवा.
सहद, हिरडा मिसळून खावे, सुऔठ धने पावडर २५ ग्रँम घेउन याच्या तिन खुराक बनवुन पाण्यात काढा करून प्या. गुळवेल सत्व, नारळ पाणि, मुगाचे कढण, पडवळाचि भाजि, असा पथ्यकारक आहार घ्यावा.
कटाक्षाने टाळाः। फूलकोबि, मसालेदार, चमचमित, बाहेरचे हाँटेलचे जेवण, नाश्ता, मिठाया, बटाटा, वांगे, मिरची, आंबवलेले सर्व पदार्थ, वर्ज करा..
आयुर्वेद उपचारात रोगी ७५% केवळ पथ्यानेच बरा होतो २५% औषधाने.. हे मात्र महत्वाचे!!!..
No comments:
Post a Comment