Sunday, September 22, 2019

केस गळतीची समस्या दूर

1) लसुन, कांदा अथवा आले यांचा रस काढून तो केसांच्या मुळांना लावावा. रात्री केसांना रस लावून सकाळी केस स्वच्छ धुवावेत. यामुळेही केस गळतीची समस्या दूर होते.

2) एक कप पाण्यात दोन बॅग ग्रीन टी मिसळून हे पाणी केसांच्या मुळांना लावावे. एका तासानंतर केस धुवावे. यामुळे केस गळती थांबून केस मजबूत होतात.

3) कांद्याचा रस लावा. अर्धा तासानंतर धुऊन टाका. यामुळे डोक्याची तब्येत चांगली होतील.

4) तुमचा खुराक चांगला असला पाहिजे. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले दिसतात. प्रोट्रीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा.

5) ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा.

6) तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे. कोमट असावे.

7) डोकं वर करून आणि पद्धतशीर चाला. घाम जास्त आला तर तो सुकण्याची वाट बघु नका ओल्या कपड्याने तो पुसून टाका.

8) जास्त गरम पाण्याने केस धुवू नये.

9) घट्ट वेणी किंवा अंबाडा बांघल्याने टाळूवर ताण येऊन केस नाजूक होऊ शकतात. केस ओले असतानाही घट्ट बांधू नयेत.
#सहारा_आयुर्वेदा
9890007014

No comments:

Post a Comment